आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती:वेळेचा योग्य उपयोग केला तरच आपली, समाजाची प्रगती होईलॉ

माजलगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळेचा योग्य उपयोग केला तरच कुटूंबाची आणि सोबतच समाजाची व देशाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने पैशाप्रमाणेच वेळेचीही किंमत लक्षात ठेवावी, असे प्रतिपादन चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी केले.

माजलगाव येथे तालुका माहेश्वरी सभेच्या पुढाकारातून बुधवारी (ता.८ जून) सायंकाळी ६ वाजता राजस्थानी मंगल कार्यालयात महेश नवमी साजरी करण्यात आली. याप्रसंगी जाजू हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंपालाल नावदंर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजर्षि शाहू बँकेचे संचालक तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय सदस्य सत्यनारायण लोहिया, अखिल भारतीय सदस्य गोविंद बजाज, प्रदेश सदस्य जुगलकिशोर झंवर, राजेंद्र इंदानी, राध्येश्याम लोहिया, जिल्हा उपाध्यक्ष बालाप्रसाद भुतडा, संयुक्त मंत्री विनोद बजाज, संघटन मंत्री डॉ.कमलकिशोर लड्डा, महिला अध्यक्ष रेखा बाहेती, युवा सचिव कृष्णा कासट हे उपस्थित होते. पुढे बोलताना शिवप्रसाद जाजू म्हणाले की नवीन काही करायचे असेल तर जुने सोडण्याची तयारी ठेवा.

वेळेचा सन्मान तुम्ही केला तर वेळ तुमचा सन्मान करेल. आज आपल्या आयुष्यात ८० टक्के कामे ही अर्जंट झाली आहेत पण ती कमी महत्वाची आहेत, असे ही जाजू यांनी सांगितले. यावेळी गोविंद बजाज, सागर मानधने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी महिला मंडळातर्फे ऑनलाईन कृष्ण सजावट स्पर्धेचे तसेच युवा माहेश्वरी नी घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच मागील १४ वर्षांपासून रोज सकाळी निघत असलेल्या प्रभात फेरीतील सदस्यांचा, बालाजी मंदिर निर्माण करणाऱ्या टीमचा तसेच इतर सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीचा यथोचित सन्मान करण्यात आला. नावदंर परिवाराकडून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. एक हजारापेक्षा जास्त माहेश्वरी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका सचिव उमेशकुमार जेथलिया यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष नवलकिशोर काबरा यांनी मानले. यावेळी दिलीप रांदड, रमेश बाहेती, जगदीश चांडक, गणेशलाल नावंदर, जगदीश टवणी, विनोद जाजू, शहराध्यक्ष विपीन नावंदर, शिरीष नावंदर, युवा अध्यक्ष आकाश बियाणी, युवा उपाध्यक्ष अमर बजाज, कैलास मानधने, लक्ष्मी नारायण नावंदर, रोहित नावंदर, विवेक मुंदडा आदींची उपस्थिती होती.

चिमुकल्यांनी साकारली शिव-पार्वतीची वेशभूषा
महेश नवमीनिमित्त भगवान महेश यांच्या प्रतिमेची बँड पथकासोबत वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. शिवाची वेशभूषा अथर्व मुंदडाने, पार्वती - आध्या चांडक, कार्तिक-वेद कलंत्री, गणपती-आयुष्य सोनी, नंदी वरद इंदानी, गण-रुद्र जेथलिया, आरुष सोनी या बालकांनी वेशभूषा साकारल्या. अनुपमा कलंत्री, अंजली बजाज, पुष्पा मालपाणी, लीला बाहेती यांनी महेश वंदनेसह आरती केली.

बातम्या आणखी आहेत...