आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक परिस्थितीची करणार पाहणी:विरोधी पक्षनेते अजित पवार उद्या जिल्हा दौऱ्यावर

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर रविवारी (दि. ३१) येत असून परळी, अंबाजोगाई, माजलगाव व वडवणी तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. रविवारी (३१ जुलै) सकाळी ८.२० वाजता परळी येथे आमदार धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेते पवार यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन सकाळी १० वाजता जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथे आगमन हाऊन सकाळी १०.१५ वाजता पीक परिस्थितीची पाहणी करतील. सकाळी ११.४५ वाजता बेलुरा (ता. माजलगाव) येथे आगमन होणार असून पीक परिस्थितीची पाहणी. दुपारी १२.३० वाजता मोटारीने चिंचोली (ता. वडवणी) येथे आगमन हाेणार असून तालुक्यातील पीक परिस्थितीची पाहणी केल्यानंतर दुपारी १ वाजता मोटारीने वडवणी येथे आगमन व राखीव. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पीक परिस्थितीबाबत आढावा बैठकीत चर्चा करतील. दुपारी २.४५ वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन, पत्रकार परिषद व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी राखीव. सायंकाळी ४ वाजता औरंगाबादकडे रवाना हाेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...