आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:तक्रारीचा खर्च देण्याचे मंचाने दिले आदेश; मुदत ठेव परत देण्यास नकार देणाऱ्या मल्टिस्टेटला ग्राहक मंचाचा दणका

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुदत ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या माजलगावातील एका मल्टिस्टेट पतसंस्थेला ग्राहक मंचाने दणका दिला. मुदत ठेवीची रक्कम व्याजासह देतानाच तक्रारदाराला मानसिक व आर्थिक खर्च म्हणून ४ हजार रुपये देण्याचे आदेश मंचाने दिले आहेत.

माजलगाव शहरातील ओमप्रकाश रतनलाल मालपाणी यांनी येथील महानंदा मल्टिस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे १३ जानेवारी २०१७ मध्ये प्रत्येकी १ लाख रुपयांचे १० वेगवेगळ्या मुदत ठेवी १२ महिन्यांच्या कालावधीसाठी केल्या होत्या. मुदत संपल्यानंतर त्यानी ठेव परत देण्याची मागणी केली. परंतु, येथील शाखाधिकाऱ्यांनी अनेक वेळा देतो देतो म्हणत पाच-सहा वेळेस त्यांना परत पाठवले.

मालपाणींनी आमचे डिपॉझिट का देत नाही म्हणत शाखाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण संतोष टोपा राठोड (रा. तालखेड) यांना जामीन असल्याने आम्ही तुमच्या डिपॉझिट देऊ शकत नाही असे सांगितले. यानंतर मालपाणींनी सदरील मल्टिस्टेटकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही या बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी याची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे मालपाणींनी २३ सप्टेंबर २०२१ रोजी बीड येथील ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.

मंचाच्या आदेशानुसार, तक्रारदारास त्यांचे १० लाख रुपये डिपॉझिट १३ टक्के व्याज दराने परत करावे व तक्रारदाराला मानसिक व आर्थिक त्रासापोटी तीन हजार रुपये व तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये असे एकूण ४ हजार रुपये देण्याचे आदेश दिला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीधर कुलकर्णी, सदस्य अपर्णा दीक्षित व मेघा गरुड यांनी हा निर्णय दिला. मालपाणींच्या वतीने अॅड. ए. एम. श्रीमाळ यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...