आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण:माजलगावात 11 सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय कविसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्ताने साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्थेने राज्यस्तरीय कविसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता वैष्णवी मंगल कार्यलयात केले असल्याची माहिती कार्यक्रमाचे संयोजक सुमंत गायकवाड यांनी दिली.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस कविसंमेलनाचे उदघाटक असून त्यांच्या शुभहस्ते माजलगावचे भूमिपुत्र सिनेअभिनेते संदीप पाठक यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार डी. के.देशमुख हे असतील.

आमदार प्रकाश सोळंके यांचेसह मसाप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, नवविकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. सिताराम शर्मा, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलींद आवाड, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक डॉ. धनंजय भिसे, माजलगावच्या मसाप उपाध्यक्षा प्रा.स्नेहल पाठक, अॅड. आर.डी. भिलेगावकर, आर.बी.देशमुख शिरीष देशमुख, डॉ. सचिन देशमुख, गौतम वैराळे, प्रभाकर साळेगावकर यांची उपस्थिती असणार आहे. मसाप पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पन्नास तर माजलगाव शहरातील अनेक कवींची उपस्थिती असणार आहे. साहित्यिक आणि नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कविसंमेलनाचे निमंत्रक सुमंत गायकवाड व उषा गायकवाड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...