आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक बालकामार विरोधी दिनाचे औचित्य साधून बीडमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या रॅलीत विविध स्वयंसेवी संस्था, बालहक्क कार्यकर्ते, बालकल्याण समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
१२ जून हा बालकामगार विरोधी प्रथा दिन म्हणून जगभरात पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून बालमजूरी प्रथेच्या बाबत जनजागृती केली जाते. बीडमध्ये रविवारी सकाळी बीड शहरातून जनजागृती रॅली काढली गेली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सिद्धार्थ गोडबोले, अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा परिषद कन्या शाळेतून रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात रॅलीचा समोराप करण्यात आला. रॅलीमध्ये रष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बीड, ज्ञानसागर बहुद्देशीय सेवाभावी संस्था, चाईल्ड लाईन ,महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ,आनंदग्राम संस्था, पसायदान सेवा प्रकल्प ,शांतीवन प्रकल्पातील मुलांसह बाल कल्याण समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये रष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बीडचे प्रभारी प्रकल्प संचालक गणेश आवंतकर, व्यवसाय शिक्षक शेख ताहेर उपस्थित होत
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.