आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रमांचे आयोजन‎:सरस्वती विद्या मंदिर शाळेत संविधान‎ दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन‎

बीड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संविधान जनजागृती अभियान व सरस्वती‎ विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय‎ संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांची‎ सुरुवात गुरुवारी (ता.२४ नोव्हेंबर) झाली. माझ्या‎ आयुष्यात संविधानाचे महत्त्व आणि संविधान‎ उद्देशिकेचे महत्व या दोन विषयांवर निबंध स्पर्धा‎ आयोजित करण्यात आली. निबंध स्पर्धेबरोबरच‎ संविधानावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची‎ ‘प्रश्नमंजुषा’ ही स्पर्धा घेण्यात आली.

या दोन्ही‎ स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात‎ सहभाग घेतला. निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषा‎ स्पर्धेबरोबरच संविधानावर स्वलिखित कविता,‎ गोष्ट, संविधान जनजागृती घोषवाक्य, वक्तृत्व‎ स्पर्धा अशा विद्यार्थ्यांच्या अंगातील सुप्त गुणांना‎ वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले‎ आहे. उपक्रमांच्या यशस्वितेसाठी डॉ.नंदकुमार‎ उघाडे,‌ ज्ञानेश्वर ढोरमारे, उज्ज्वला लाखोळे,‎ पुरुषोत्तम येडे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...