आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:तीन दिवसीय योग सराव शिबीराचे अयोजन; महिला कला महाविद्यालयात योग सराव शिबिर उत्साहात

बीड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक योग दिनानिमित्त येथील महिला कला महाविद्यालयात विद्यार्थीनीं, प्राध्यापक, महाविद्यालयनी कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय योग सराव शिबीराचे अयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय योग शिबिराचा समारोप सोमवारी (दि.२०) उत्साहात पार पडला. शनिवारी (दि.१८) योग शिबिराची सुरवात करण्यात आली होती. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता शेटे यांच्या हस्ते योग शिक्षक विलास गवते यांचा सन्मान करण्यात आला. योग शिक्षक विलास गवते यांनी योग म्हणजे काय? योगाचे आणि योग दिनाचे महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली.

दररोज योगा केल्याने शरीरावर होणारा साकारात्मक परिणाम सर्वांसमोर मांडला. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा कसा फायदेशीर आहे, हे प्रात्याक्षिकासह सांगितले. योगा केल्याने शरीराला मिळणारी ऊर्जा, स्नायूंची वाढणारी ताकद तसेच तणाव मुक्तीसाठी योगाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दररोज स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी योगा करण्यासाठी योग शिक्षक श्री. गवते यांनी सर्वाना प्रेरित केले. तसेच योग सराव शिबिरात योगाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिकासह माहिती देऊन सर्वांकडून योगासने करून घेतली. यामध्ये त्रिकोणासन, वृक्षासन, ताडासन, बैठक स्थितीतील सर्वाशासन, शवासन, अर्धचंद्रासन, भुजंगासन, धनुरासन, शलभासन, हलासन, नौकासन अशी योगासने आणि प्राणायाम घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...