आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमिश्र:13 पैकी 6 राष्ट्रवादीकडे, 4 भाजप, 2 शिवसेना तर गवळवाडीत संमिश्र

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई, गेवराईसह बीड तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी मतदान होऊन शुक्रवारी मतमोजणी झाली. या निवडणूक निकालात १३ पैकी ६ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या. तर चार ठिकाणी भाजप, दोन ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्यात. गवळवाडी (ता. बीड) ग्रामपंचायतीत सर्वच राजकीय पक्षांना यश मिळाल्याने ही ग्रामपंचायत संमिश्र ठरली आहे.

बीड : ३ पैकी २ ग्रामपंचायती माजी मंत्री क्षीरसागरांच्या ताब्यात
बीड मतदारसंघातील गवळवाडी, अंथरवन पिंपरी-गणपूर, अंथरवण पिंपरी तांडा या ३ ग्रामपंचायतींचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला. यापैकी अंथरवण पिंपरी-गणपूर व अंथरवन पिंपरी तांडा या दोन ग्रामपंचायतींवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार निवडून आलेत. या निवडणुकांपूर्वीच मतदारसंघातील झालेल्या सेवा सोसायट्यांच्या निवडणुकीत जवळपास ९० टक्के सोसायट्यांवर माजी मंत्री क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार निवडून आलेत. गवळवाडी ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र राजकीय पक्षांना यश मिळाले.

गेवराई : ५ पैकी ५ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे
गेवराई तालुक्यातील पाचेगाव, सिरसमार्ग, दिमाखवाडी, जयराम तांडा, वसंतनगर तांडा या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. पाचेगाव, सिरसमार्ग, दिमाखवाडी, जयराम तांडा या ग्रामपंचायतींवर माजी आ. अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने वर्चस्व प्रस्थापित केले. पाचेगाव व सिरसमार्ग या मोठ्या गट आणि गण असलेल्या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. सिरसमार्ग ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात होत. गावात विकासकामे झाली नसल्यानेच मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून येते. तर वसंतनगर तांडा येथील ग्रामपंचायत भाजपच्याच ताब्यात आली.

अंबाजोगाई : तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी सरस
अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक ५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. चनई, श्रीपतरायवाडी, दगडवाडी येथे भाजप पुरस्कृत पॅनल विजयी झाले, तर लोखंडी सावरगाव, मोरेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या.

अंथरवण पिंपरी भाकपचा दावा
अंथरवण पिंपरी (ता. बीड) ग्रामपंचायत निवडणुकीत क्रांतिसिंह कॉ. नाना पाटील पॅनलने ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवल्याचा दावा भाकपने केला. ग्रामपंचायतीच्या जुन्या कारभाऱ्यांना मतदारांनी नाराजी व्यक्त करून नव्या प्रतिनिधींना संधी दिली. सर्व विजयी उमेदवार आणि पॅनलप्रमुख, समर्थकांचा भाकप कार्यालयात पुष्पहार-गुच्छ देऊन आणि पेढे भरवून सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...