आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकट:वडवणी तालुक्यात "लम्पी’चा प्रादुर्भाव, पशुवैद्यकीय विभाग मात्र प्रभारींवरच

वडवणी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी तालुक्यासह जिल्ह्यात जनावरांना लम्पी या संसर्ग आजाराची बाधा झाली आहे. दोन ठिकाणी बाधित जनावरे आढळली असून सध्या परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालय प्रभारींवरच सुरू आहे. माजलगाव येथून सध्या अधिकारी कारभार हाकत आहेत, तर तीनही पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याचे दिसून येत आहे.

वडवणी शहरातील एका गायीला व साळिंबा येथील एका गोऱ्याला लम्पी या संसर्गजन्य आजाराची लागण ८ सप्टेंबर रोजी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार त्यांचा उपचार केला जात असून, प्रकृती सुधारत आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार पशूंमध्ये वाढू नये, म्हणून शासन आणि विशेष पशू विभाग कामाला लागले आहे. तालुक्यातील गावागावात जाऊन आजारी पशूची देखभाल करावी याबाबत जनजागृती केली जात आहे. सोमवारी (१२ सप्टेंबर) स्थानिक प्रशासनासह बीड येथील अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी दाखल झाले होते. पशुवैद्यकीय दवाखाना येथे तालुक्यातील लम्पी या आजारावर बैठक घेण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत तालुक्यात दोनच बाधित पशू वाढले असले, तरीही प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल टाकले आहे. परंतु पुरेसे अधिकारी नसल्याने कामकाजावर मर्यादा येत आहेत. माजलगाव येथील पशुसंवर्धन अधिकारी सद्य:स्थितीत वडवणीचा कारभार हाकत आहेत. किमान या संकटाची चाहूल लक्षात घेता तालुक्याला कायमस्वरूपी अधिकारी मिळण्याची आवश्यकता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...