आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा घरोघरी:कार्यशाळेमध्ये शंभरावर गणेशमूर्ती साकारल्या, मातीचे गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी घरोघरी गणरायाचे आगमन होणार असून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिव्य मराठीच्या वतीने रविवारी माजलगाव येथे ‘मातीचे गणेश कार्यशाळा’ घेण्यात आली. महिला, युवती, चिमुकल्यांनी शाडूच्या मातीपासून शंभरावर गणेशमूर्ती साकारल्या. या कार्यशाळेतील पर्यावरणपूरक मूर्ती प्रत्येकाच्या घरी विराजमान होणार आहेत.

दैनिक ‘दिव्य मराठी’च्या वतीने प्रत्येक घरी मातीचे गणपती हे अभियान राबवले जात आहे. माजलगाव येथे या अभियानांतर्गत समता कॉलनी भागातील स्वरूप ब्यूटी पार्लर येथे रविवारी महिलांसाठी खास मातीचे गणराय विशेष कार्यशाळा झाली. सरपंच रूपाली कचरे, रेणुका लोढा, अर्चना बोरा, शर्मिला सोळंके, संध्या देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षक निखिल मुळी, शारंगधर धर्माधिकारी, श्रीपाद नवशिंदे यांनी महिला व चिमुकल्यांना शाडूच्या मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कशा घडवायच्या याबाबत माहिती दिली. दरम्यान, या कार्यशाळेत संगीता बोडखे, लता लंगडे, अर्चना मिटकरी, अंकिता भुतडा, श्रध्दा ठोसर, दीपाली मुळे, विजयश्री देशमुख, आशा स्वामी, दुर्गा राऊत, अश्विनी सोळंके, सुधा राठोड, संगीता आमसुले, अश्विनी वळसे, रेखा पाठक, प्रतीक्षा सोळंके, श्रध्दा गोळेकर, श्रध्दा चव्हाण, पायल गायकवाड, क्षितिजा लाखे, स्नेहल चौरे, आकांक्षा चौरे, आदींनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी दिलीप झगडे यांनी केले तर छायाचित्रकार गोविंद उगले यांनी आभार मानले.

यांनी मिळवले पारितोषिक
दिव्य मराठीच्या वतीने या कार्यशाळेत सहभागी होऊन महिला, चिमुकल्यांनी उत्कृष्ट अशा गणेश मूर्ती घडवल्या. महिलांमधून रूपाली शरद कचरे प्रथम, अश्विनी वळसे द्वितीय तर प्रतीक्षा सोळंके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. चिमुकल्यांच्या गटातून स्वराज मालानी, अर्णव भुतडा, तेजस मालानी, तन्मय मालानी, अनुज भुतडा यांनी एकत्रित बनवलेली गणेश मूर्ती प्रथम ठरली. वेदिका विकास मालाणी द्वितीय क्रमांक तर आदित्य चव्हाण, हर्षवर्धन लाखे यांनी बनवलेली गणेश मूर्ती तृतीय ठरली.

कलेच्या देवतेला अभिप्रेत उपक्रम
गणराय ही कला व विद्येची देवता. मातीपासून स्वत:चे कलाकौशल्य वापरत मूर्ती घडवल्याने त्यात खऱ्या अर्थाने संपूर्ण जीव ओतला गेला. चिमुकले तर मूर्ती घडवताना अगदी दंगून गेले होते. स्वत: घडवलेली मूर्ती पाहून खराेखर आनंद वाटला. ही पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती कार्यशाळा कलेच्या देवतेला अभिप्रेत अशीच ठरली.’शर्मिला सोळंके, माजलगाव

घरच्या घरी होणार विसर्जन
उत्सव साजरे करत असताना त्याचा पर्यावरणाला त्रास होऊ नये. एका अर्थाने पर्यावरणही ईश्वराचा अंश आहे. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरणाचीही काळजी घेतली पाहिजे. मातीच्या गणेश मूर्ती या पर्यावरणपूरक असून या मूर्तींचे विसर्जनही घरच्या घरी करता येण्यासारखे आहे. दिव्य मराठीचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
- संध्या देशमुख, माजलगाव

वेगळ्या आनंदाची अनुभूती
दिव्य मराठीच्या वतीने आयोजित मातीचे गणेश ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण होण्यासह स्वत:च्या हाताने गणेशमूर्ती घडवण्याचा वेगळा आनंद मिळाला. स्वत: बनवलेली मूर्ती यंदा घरी विराजमान करणार आहोत.’- रेणुका सुशील लोढा, माजलगाव

चांगल्या उपक्रमाची परंपरा
यापूर्वीही दिव्य मराठीच्या या पर्यावरणपूरक व विविध उपक्रमांत आम्ही सहभागी झालो होतो. मूर्ती घडवण्याचे कसब शिकायला मिळाले शिवाय पर्यावरणाची काळजी घेता आली याचा आनंद वाटतो.’- अर्चना बोरा, माजलगाव

पर्यावरणास्नेही उपक्रम
दिव्य मराठीचा घरोघरी मातीचे गणपती हा उपक्रम पर्यावरणस्नेही आहे. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस या प्रदूषणकारी घटकाला टाळण्याचे महत्व अधोरेखित झाले. स्वत: मूर्ती घडवून स्थापना करता येणे ही फार समाधानाची बाब आहे.- रूपाली कचरे, सरपंच, राजेगाव

बातम्या आणखी आहेत...