आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश उत्सव:जिल्हाभरात शंभर टनांहून अधिक गुलालाची उधळण ; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात प्रत्येक मंडळांकडून माेठ्या प्रमाणावर गुलाला खरेदी केला जातो. काेराेनानंतर प्रथमच हाेणाऱ्या गणेश उत्सवात बीड शहरासह जिल्ह्यात सरासरी शंभर टनाहून अधिक गुलालाची उधळण झाली आहे. बीड शहरासह जिल्ह्यात गुलालाची आवक माेठ्या प्रमाणावर राजस्थान येथून हाेत असते. त्यानंतर सातारा जिल्ह्यातून गुलालाची आवक बीडमध्ये हाेते. दहा किलाे गुलालाची एक बॅग सरासरी शंभर रुपयांना मिळते. त्यानुसार, बीड शहरासह जिल्ह्यात यंदाच्या गणेश उत्सवात सरासरी शंभर टनाहून अधिक गुलालाची उधळण गणेश मूर्ती स्थापना तसेच विसर्जन मिरवणुकीमधून झाली. २०१८ या वर्षामध्ये गणेश उत्सवासाठी सरासरी ६० टन गुलालाची उलाढाल झाली हाेती. त्या तुलनेत कोरोनाच्या ३ वर्षानंतर नागरिकांनी उत्साहात यंदा गणेशोत्सव साजरा केला. यंदाच्या वर्षी सरासरी शंभर टनाहून अधिक गुलालाची विक्री झाली असून सरासरी नऊ लाखापर्यंत आर्थिक उलाढाल झाली असल्याचा अंदाज बीडमधील विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. गुलालातून मोठी उलाढाल झाली असली तरी अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...