आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा पातळीवर विविध स्पर्धा:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विमला विद्यालयात चित्रकला स्पर्धा

गेवराई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर साजरा होत असताना महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळा पातळीवर तीन दिवस घ्यावयाच्या विविध स्पर्धा येथील विमला माध्यमिक विद्यालयात पार पडल्या. तीन गटात घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवीच्या गटातून प्रथम रोहित भास्कर येवले, द्वितीय राणी धोंडीराम कदम, तृतीय क्रमांक रोहित महादेव चाळक यांनी पटकावले. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटात प्रथम भक्ती परमेश्वर बूलबूले, द्वितीय साक्षी सयाजी गोरे, तृतीय क्रमांक समर्थ रघुनाथ आतकरे यांनी क्रमांक मिळविले. नववी ते दहावी गटात प्रथम मयूरी स्वप्निल दायमा, द्वितीय चंदना ज्ञानेश्वर गायकवाड, तृतीय क्रमांक यशराज संभाजी म्हेत्रे यांनी मिळवला.

निबंध लेखन स्पर्धेत सहावी ते आठवी गटात साक्षी सयाजी गोरे, अंजली मच्छिंद्र धोत्रे, आकांक्षा ईश्वर टोणपे यांनी अनुक्रमे यश प्राप्त केले. नववी ते दहावी निबंध लेखन गटात प्रथम सिद्धी लक्ष्मीकांत सराफ, द्वितीय सानिका शिवाजी गिरे, तृतीय श्रूती सूर्यकांत रिंगणे यांनी क्रमांक पटकावले.तिसऱ्या दिवशी घेतलेल्या आठवी ते दहावी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम सिद्धी लक्ष्मीकांत सराफ, द्वितीय अंजली मच्छिंद्र धोत्रे व तृतीय शुभांगी विष्णू सातपुते यांनी यश प्राप्त केले. चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून सूनिल जाधव व नितीन कुलथे, निबंधासाठी दिपिका भालेराव व करूणा जवंजाळ तर वक्तृत्व स्पर्धेसाठी संजय खेडकर व सूनिल जिरेवाड यांनी काम पाहिले. विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...