आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्थान:श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा पालखी सोहळा , 29 जून रोजी पंढरपूर कडे होणार प्रस्थान

शिरुर कासार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ॐ चैतन्य श्रीगहीनीनाथ महाराज व प्रतस्मरणीय श्री संत वामणभाऊ महाराज पादुका पालखी सोहळा श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथुन प्रस्थान बुधवारी (दि. २९) दुपारी २ ते ४ प्रस्थान होणार आहे. तेव्हा या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महंत विठ्ठल महाराज शास्त्री श्री क्षेत्र गहिनीनाथ गड यांनी केले आहे

हा पालखी सोहळा याही वर्षी महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली याही वर्षी मोठ्या थाटात हा पालखी सोहळा दि. २९ रोजी मोठ्या लवाजम्यासह प्रस्थान होणार आहे. या दिंडी सोहळ्याचे योग्य नियोजन आणि प्रयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवारी श्री नाथांचे व श्रीगुरु परंपरांचा अभिषेक करून सांगळे यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या नातवा कडून दुपारी भोजन करून दोन ते चार या वेळेत प्रस्थान होणार आहे तर रात्रीचा मुक्काम निवडुंगा ता. पाटोदा येथे होणार आहे. गुरुवार (दि. ३०) रोजी वाहाली सावरगाव मुगगाव वनवेवाडी मातकुळी डोंगर आणि मातकुळी मैदान येथे मुक्काम होणार आहे. शुक्रवार दिनांक एक जुलै रोजी जरे वस्ती जामदरवाडी जामखेड विठ्ठल मंदिर जगदाळे वस्ती श्री संत वामनभाऊ महाराज गड जामदार वाडी आणि सारोळा येथे मुक्काम होईल. शनिवार दिनांक दोन जुलै रोजी सारोळा वस्ती खुर दैठण घोडेगाव आपटी पिंपळगाव वस्ती आणि पिंपळगाव उंडा येथे मुक्काम होईल.

रविवार दिनांक तीन जुलै रोजी पिंपळगाव वस्ती जवळके सटवाईचे जाधव वस्ती शिंदे वस्ती चिंचपूर मशिदीचे कोठे भिलारे वस्ती पांढरेवाडी आटोळे वस्ती शेळगाव आणि तांदळवाडी येथे मुक्काम होईल. सोमवार दिनांक चार जुलै रोजी देऊळगाव कसाबाचे डोंजे बंगाळवाडी आणि मिरगव्हाण येथे मुक्काम होईल. मंगळवार दिनांक पाच जुलै रोजी मिरगव्हाण वस्ती नागोबाचे हिवरे सालसे आळसुंदे वस्ती आणि मूर्तीचे वरकुटे येथे मुक्काम होईल. बुधवार सहा जुलै रोजी मूर्तीचे वरकुटे रोपळे रिंगण आठरे भोगे वस्ती आणि भोगेवाडी येथे मुक्काम होईल. गुरुवार दिनांक सात जुलै रोजी ढवळस पिंपळखुंटे अंबड शिराळाचे कोठे भेंड आबा पाटील आणि आरण सावता बाबाचे यांचे मुक्काम होईल सुभाष सुराणा मुरड. शुक्रवार दिनांक आठ जुलै रोजी बार्डी जाधववाडी पवार वस्ती पाटा वरील मेंढापूर मेंढापूर पाटील वाडा पादुका रिंगण माजी आमदार भीमराव धोंडे यांचे भोजन आणि रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्काम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...