आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गोदावरी नदी दुथडी:पांचाळेश्वर, राक्षसभुवनची मंदिरे पाण्याखाली, शनिमंदिराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जायकवाडी धरणाचे दि,१८ शुक्रवार रोजी पहाटे सर्व दरवाटे चार फुटानी उघडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी पात्रात दुपारी पर्यत ९४ हजार ३२० क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. उजवा व डावा कालव्यात पूर्ण क्षमते प्रमाने पाणी सोडण्यात आलेले आहे. वरिल येनारी आवक वाढत गेली तर गोदावरीत जास्त पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येनार आहे यासंबधी गोदाकाठच्या गावक-यांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील गोदाकाठी वसलेल्या क्षेत्र पंचाळेश्वर, राक्षसभुवन दोन्ही मंदिरे पूर्ण पाण्याखाली गेले आहे. शनीमहाराज संस्थान कार्यालयला पाण्याचा वेढा पडला असून परिसरात पूर्ण पाणी घुसले आहे. या भागातील सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहेत. पाणीपातळी वाढत असल्याने शनी मंदिराच्या दुस-या मजल्या पर्यंत पाणी पोहचले आहे त्यामुळे गावक-यात भितीचे वातावरन पसरले आहे. गोदाकाठच्या ३२गावांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.