आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद , पंचायत समिती नवीन गट व गण फेररचना जाहीर करण्यात आलेली असून आष्टी तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गण निर्माण झालेले आहेत. एक गट व २ गणांची भर पडली आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य निवडीसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.
यासाठी लोकसंख्या आधारावरील नवीन गट व गण रचना गुरुवारी जाहीर झाली. या नुसार आष्टी तालुक्यात जिल्हा परिषदेचा बीडसांगवी हा एक गट वाढला असून एकूण आठ गट झाले आहेत. तर पंचायत समिती गणात ही२ ची भर पडली असून आता १६ गण असणार आहेत .
बीडसांगवी आणि खडकत हे दोन नवीन गण आहेत. एक बीडसांगवी गटात तर दुसरा मुर्षदपूर गटात आहे. नवीन गट दौलावडगाव, धामणगाव, बीडसांगवी, धानोरा ( पूर्वीचे नाव दादेगाव ), लोणी, कडा मुर्षदपूर आणि आष्टा ( हरि नारायण . तर नवीन गणात दौलावडगाव , सावरगाव घाट, धामणगाव, सुरुडी , बीडसांगवी , ब्रम्हगाव , डोंगरगण , धानोरा , लोणी , टाकळी (अमिया), कडा, शिराळ, मुर्षदपूर, खडकत , आष्टा ( ह ना ) आणि पांढरी असे आहे.
यापैकी कडा गणात सर्वात कमी म्हणजे फक्त दोन ग्रामपंचायत आहेत तर सर्वाधिक १३ ग्रामपंचायती असलेली गावे टाकळी (अमिया) गणात आहेत . या गटांची आणि गणांची फेररचना झाल्याने त्याबद्दल कोणाला काही हरकत असेल तर ८ जून पर्यत जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.