आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ हातांत विविध आयुधे:कड्यात 425 वर्षांपूर्वीची पंचधातूची गणेशमूर्ती ; नवव्या हातात कमल पुष्प, तर दहाव्या हातात रिद्धी

कडा / राजेश राऊत22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यात नवगणराजुरी, लिंबागणेश, गंगामसला, राक्षसभुवन, नामलगाव येथील गणपती इतिहास प्रसिद्ध असून आष्टी तालुक्यातील कडा गावातील गणेशभक्त शशिकांत पांडुरंग देशमुख यांच्या देवघरात पंचधातूची चार इंच उंचीची चारशे ग्रॅम वजनाची दशभुजा गणेशमूर्ती गणेशभक्तांसाठी कुतूहलाचा विषय बनली आहे.

मागील ४२५ वर्षांपासून या कुटुंबाकडून सदर गणपतीची अखंड पूजा सुरू आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त याबाबत माहिती जाणून घेतली. कडा गावाच्या मध्यभागी ऐतिहासिक गढीत गणेशभक्त शशिकांत पांडुरंग देशमुख यांचे घर आहे. घरातील देव्हाऱ्यावर विठ्ठल-रखुमाई बरोबरच गणपती बाप्पाची दशभुजा असलेली पंचधातूची प्राचीन मूर्ती आहे. भगिनी निवेदिता विद्यालयात शिक्षक असलेले अमोल देशमुख यांनी देवघराची माहिती देताना सांगितले की, शिसवी लाकडापासून तयार केलेले हे देवघर या कुटुंबाचे मुख्य देवघर आहे. देवघरातील पंचधातूच्या गणेशमूर्तीची उंची ४ इंच आहे. मूर्तीचे वजन ४०० ग्रॅम आहे.

या मूर्तीला दहा हात असून मूर्तीची दशभुजा गणेश अशी ओळख आहे. या गणपतीच्या आठ हातांत विविध आयुधे असून आशीर्वादासाठी पुढे केलेल्या एका हातात कमल पुष्प आहे. दुसऱ्या हाताने रिद्धी-सिद्धीपैकी एकीला आधार दिला आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेतून या मूर्तीचे देवघरात जतन करण्यात आले आहे. मात्र ही मूर्ती कधी तयार झाली असावी हे सांगता येणार नसल्याचे शशिकांत देशमुख यांनी सांगितले. दर चतुर्थीनिमित्त भाविक या पंचधातूच्या मूर्तीच्या चरणी मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात.

बातम्या आणखी आहेत...