आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांचे अर्धातास मौन:महापुरुषांच्या अवमानाचा गोपीनाथ गडावर बहीण खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह नोंदवला निषेध

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सोमवारी गोपीनाथ गडावर अर्धातास मौन पालन केले. महापुरुषांच्या अवमानप्रकरणी त्यांनी अनोख्या मार्गाने निषेध नोंदवला.

गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या गोपीनाथ गडावर पोहचल्यात. तिथे त्यांनी अर्धातास मौन पाळले.

महापुरुषांच्या अवमान प्रकरणी राज्यातले राजकारण चांगलेच पेटले आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप आक्रमक झाला. त्यानंतर विशेषतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष आक्रमक झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गटातील मंत्रीही याप्रकरणी उघड-उघड संताप व्यक्त करतायत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्यांनी औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने गोची केली आहे. आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी थेट रायगडवर जात आपली भूमिका स्पष्ट करत कोश्यारी हटवाची मागणी केली. उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा निषेध नोंदवला. शिंदे गटातील मंत्र्यांनीही राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करून राज्यपाल कोश्यारी उघड माथ्याने फिरतातच कसे, त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केला. कोश्यारी यांना पुण्यात काळे झेंडेही दाखवण्यात आले.

राज्यपालांच्या विधानानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झालाय. देशात सध्या सर्व सरकारनेच करावे, अशी भावना निर्माण झालीय. यापूर्वी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनी शाळा काढल्या. त्यासाठी सरकारी अनुदान घेतले नाही. भीक मागून शाळा उभ्या केल्या, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवतेय. याप्रकरणी पुण्यात त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर अर्धातास मौन धारण केले.

बातम्या आणखी आहेत...