आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध विकास कामांबाबत चर्चा:पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती देऊन उज्जैन च्या धर्तीवर वैद्यनाथ कॉरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. आमदार माधुरी मिसाळ हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचा सर्वांगीण विकास आणि भाविक भक्तांची सोय होण्याच्या दृष्टीने मंदिर परिसराचा विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. यापूर्वी २०१९ मध्ये १३३ कोटी ५८ लाख रूपयांचा विकास आराखडा मंजूर झालेला होता, त्याअंतर्गत ३५ कोटीचा निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूरही झाला पण नंतर मात्र निधी न मिळाल्याने कामे पूर्ण होऊ शकली नाहीत परिणामी मंदिर परिसराचा विकास झाला नाही ही बाब पंकजा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल मंदिराचा कोरिडाॅर निर्माण करून जसा विकास केला अगदी त्याचप्रमाणे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा देखील कॉरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनीयावेही सांगितले.

बातम्या आणखी आहेत...