आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री म्हटल्यामुळे महाराष्ट्रतील राजकारण तापले आहे. यावर प्रतिक्रिया देताना माझ्यावर तर दारूवाली बाई म्हणून विरोधकांनी टीका केली होती, अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
फडणवीस व्यवस्थित काम करतील
भाजप स्थापना दिवसानिमित्त बीडमध्ये एका कार्यक्रमात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. त्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारण हा काटेरी रस्ता आहे. राजकारणातील सिंहासनदेखील काटेरी असते. त्यामुळे राजकारणात टीका होतच राहणार. कधी कधी टीका अत्यंत खालच्या पातळीवरही केल्या जातील. मला विश्वास आहे की, टीकेमुळे देवेंद्र फडणवीस व्यथित होणार नाही. ते त्यांच काम व्यवस्थित करतील.
रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावले
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मीसुद्धा राजकारणात अनेक टीकांना सामोरी गेली आहे. माझा डिस्टिलरी प्लान्ट आहे. त्यामुळे काही विरोधी पक्षातील नेत्यांनी माझ्यावर दारुवाली बाई अशा शब्दांत टिप्पणी केली होती. माझ्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप झाले. तेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली, माझे प्रचंड ट्रोलिंग झाले. अक्षरश: रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले. माझे फोटो लावून काही पाकिटे वाटली. माझा अपमान करण्यात आला.
वाट्याला केवळ फुलेच येणार नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारणात केवळ फुलेच वाट्याला येणार नाहीत. तर टीकाही वाट्याला येईल. अनेकदा खालच्या पातळीवरची टीका वाट्याला येईल. मला विश्वास आहे की, देवेंद्र फडणवीस या टीकेमुळे व्यथित होणार नाहीत. ते त्यांचं काम व्यवस्थित करतील. या सर्व गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत. कोणीही असं करू नये असे वाटते, परंतु ते होत राहील.
परळीत वीर सावरकर गौरव यात्रा
बीडमध्ये आज भाजपच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. याविषयी पंकजा मुंडे म्हणाल्या की, राहूल गांधी व अन्य काँग्रेस नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून माझ्या सूचनेनुसार आज परळी शहरात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने वीर सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात काढण्यात आली.
हेही वाचा,
टीकास्वयंवर:उद्धव ठाकरेंनी माणुसकी गाडली, अत्याचार करून जेलमध्ये टाकले; आरोप करताना नवनीत राणांना अश्रू अनावर!
माझ्यावर अत्याचार करून मला जेलमध्ये टाकले. तिथे दुसऱ्या महिलांना चार-चार वेळेस पाणी प्यायला मिळायचे. मला एकदाही प्यायला पाणी मिळाले नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्या अमरावतीमध्ये आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी आमदार रवी राणा आणि कार्यकर्त्यांसह त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.