आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी नाराज नाही:वाघांनो असे रडताय काय? मी आहे ना! भाजपने विधान परिषदेची उमेदवारी नकारल्यानंतर पंकजा मुंडेंचे भावनिक आवाहन

बीडएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!

भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारीत डावलल्यानंतर पंकजा मुंडे यांची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करताना त्यांनाच भावनिक धीर देण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेवर उमेदवारी नाही मिळाल्यानंतर आपल्या आई आणि ताईंना वारंवार कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे फोन येत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी अनेक जण भावूक होतात असे त्या म्हणत आहेत. परंतु, मी नाराज नसून कार्यकर्त्यांनी सुद्धा रडू नये असे आवाहन करताना यावेळी पंकजा मुंडे दिसून आल्या आहेत.

पंकजा मुंडे यांचे ट्विट...

आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!

विधान परिषदेवर आपली वर्णी लागणार नाही हे लक्षात आल्यानंतरही आपण नाराज नाहीत असेच पंकजा मुंडे म्हणत आहेत. येत्या 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होत आहेत. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांकडून भाजपवर नाराजीचा सूर गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. परंतु, या नेत्यांनी अद्याप उघडपणे आपली नाराजी जाहीर केलेली नाही. भाजपने यंदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले रणजितसिंह मोहिते, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि अजित गोपछडे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. विधान परिषद निवडणूक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना पदावर टिकून राहण्यासाठी दोनपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...