आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरग्रस्तांना मदत:पंकजा मुंडे म्हणाल्या - पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी त्याठिकाणी मदत पोहोचवणार; रॅली काढून पूरग्रस्तांसाठी गोळा केली मदत

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूरग्रस्त भागात मदत पोहोचवणार

राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामळे महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. सध्या तरी याचा विचार करणे आवश्यक आहे असल्याचे सांगून पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी त्याठिकाणी मदत पोहोचवणार असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. भाजपच्या वतीने शहरात आज पूरग्रस्तांसाठी मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी त्या बोलत होत्या.

आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो. पण व्यक्तीचा सोहळा मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुया. माझ्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पूरग्रस्त भागात मदत पोहोचवणार
मी परळीची आहे, परळीची कार्यकर्ती आहे, त्यामुळे इथे मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जाण्याऐवजी मदत तिथे गेली तर ते फायद्याचे आहे. आपण तिथे जाण्यापेक्षा, तिथे मदत पोहोचावी, असे पंकजा मुंडेंनी सांगितले. परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे. काही गावे मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभे करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. मी जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षी मी माझी मदत तिकडे पाठवेन, जिथे पूरग्रस्तांना मदत हवी आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

व्यापाऱ्यांनी पंकजा मुंडेंकडे मांडल्या आपल्या समस्या
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुरग्रस्तांच्या मदतफेरीच्या निमीत्ताने दोन वर्षानंतर प्रथमच परळीतील व्यापाऱ्यांच्या संपर्कात आल्या होत्या. सकाळी 11.15 वाजता शिवाजी चौक येथुन मदतफेरीस सुरुवात झाली. बसस्थानक,एकमिनार चौक मार्गे मोंढा भागात आल्यानंतर पंकजा यांनी व्यापाऱ्यांना मदतीचे आवाहन करत संवाद साधला. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या मदतफेरीत व्यापाऱ्यांनी मदत करण्याबरोबरच ताई आतातरी आमच्या समस्यांकडे लक्ष द्या असे म्हणत आपल्या व्यथा मांडल्या. काही व्यापाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

बातम्या आणखी आहेत...