आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंना हादरा:पांगरी-लिंबुटा सोसायटी निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनेलचा झेंडा, सर्व 13 उमेदवार विजयी

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळीजवळील पांगरी-लिंबुटा सोसायटीच्या निवडणुकीत बुधवारी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाला धूळ चारली. या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाचे सर्वच १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले. परळी नगरपालिकेचे गटनेते आणि पांगरीचे भूमिपुत्र वाल्मीक कराड हे निवडणुकीचे किंगमेकर ठरले.

पांगरी येथील सोसायटीवर तब्बल दहा वर्षांनंतर धनंजय मुंडे यांची एकहाती सत्ता आली. परळी तालुक्यातील पांगरी येथे गोपीनाथ गड असून या ठिकाणची सोसायटीची निवडणूक पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. कधी काळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे पांगरीच्या सोसायटीवर वर्चस्व होते. मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर पांगरी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणची सोसायटी पंकजा मुंडे यांच्या ताब्यात दिली. परंतु परळी विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती बदलली. बुधवारी जाहीर झालेल्या निकालात राष्ट्रवादी प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे रमेश येडबा कराड, व्यंकट तिडके, कोंडिबा दिवटे, नंदकिशोर मुंडे, मधुकर मुंडे, महादेव मुंडे, मोहन मुंडे, शांतीलाल मुंडे, शिवाबाई गित्ते, कुसुमबाई मुंडे, भागवत मुंडे, राजाभाऊ बनसोडे, कुमार काटुळे हे सर्व १३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिकेचे गटनेते वाल्मीक कराड यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व दोन्ही गावातील सर्व मतदारांचे आभार मानले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व सिद्ध आमदार धंनजय मुंडे हे एकापाठोपाठ एक स्थानिक संस्था आपल्या ताब्यात घेत आहेत. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. परळीच्या ज्या पांगरी गावात गोपीनाथ गड आहे त्याच गावातील सोसायटी निवडणुकीत भाजपचा हा दारुण पराभव झाल्याने पंकजा मुंडे समर्थकांना चांगलाच धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...