आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी:ओबीसी, मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटणार : पंकजा मुंडे, गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी गोपीनाथ गडावरून संवाद

परळी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या विचारांची वज्रमूठ बांधून मराठा आरक्षण व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून गावागावांत पोहोचणार असल्याचे सूतोवाच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले. आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील कोरोनाच्या स्थितीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी गुरुवारी पंकजा यांनी गोपीनाथ गडावर समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर जनतेशी त्यांनी संवाद साधला. खा. डॉ. प्रीतम मुंडे, खा. भागवत कराड, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, आ. सुरेश धस, आ. नमिता मंुदडा यांच्यासह मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती.

...तर आज दारोदार फिरण्याची वेळ आली नसती : “गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला मेसेज करत आहे की, गोपीनाथ मुंडेंनी भगवान गडावरून आम्हाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आज ते असते तर मराठा तरुणाला आरक्षणासाठी असे दारोदार फिरायची वेळ आली नसती. आज बहुजन समाजाचा मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी फक्त आपल्या पोळ्या भाजण्याचे काम केले आहे. ही नवी पिढी आहे. यांना खोटे सांगू नका, खरे सांगा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.

पाेस्टल एन्व्हलपचे लाेकार्पण
पोस्टल एन्व्हलपच्या माध्यमातून केंद्र सरकारने गोपीनाथ मुंडे यांचा गौरव करून एक सामाजिक संदेश दिला आहे. प्रत्येकाने हे एन्व्हलप घेऊन पंतप्रधान मोदीजींकडे आपल्या मागण्या मांडाव्यात, असे त्या म्हणाल्या. लोक म्हणतात तुमचा पराभव झाला. पराभव हा माणसाचा अल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. लोकांच्या मनातील आशा अजून मावळल्या नाहीत. याच आशा माझं ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि व्हेंटिलेटर आहेत, असे पंकजांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...