आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये नाराजीनामे:प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्याने 12 भाजप कार्यकर्त्यांनी दिले जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील पदांचे राजीनामे

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी पक्षावर नाराज नाही. सर्व नव्या मंत्र्यांचे आता तुमच्या समोर अभिनंदन करते - पंकजा मुंडे

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खा. डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांना पक्षाने डावलल्याने बीडमध्ये पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे समर्थकांचे राजीनामासत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर शनिवारी डझनभर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यात, दोन जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य आणि उर्वरित पक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यामध्ये केंद्रीय मंत्रिपदासाठी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्याऐवजी औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना संधी दिली गेली. अर्थ राज्यमंत्रिपदी त्यांची वर्णी लागली. यावर, शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण या निर्णयाबाबत पक्षावर नाराज नसल्याचेही सांगितले होते. दुसरीकडे, बीडमध्ये मात्र मुंडे समर्थकांमध्ये मात्र खा. डॉ. प्रीतम यांना मंत्रिपदी जाणीवपूर्वक डावलले असल्याची भावना असून यातून समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस सर्जेराव तांदळेंनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर शनिवारी गोपीनाथ मुंडे विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडून आलेले मात्र पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय जिल्हा परिषद सदस्य सविता रामदास बडे, भाजपच्या जि. प. सदस्य भागीरथी रामराव खेडकर यांच्यासह शिरूरचे पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, भटक्या विमुक्त आघाडीचे लक्ष्मण जाधव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, आष्टी तालुकाध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य युवराज वायभसे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, सोशल मीडिया प्रमुख अमोल वडतिले, महारुद्र खेडकर, युवा माेर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे, संतोष ढाकणे, श्याम महारनोर यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.

काही कार्यकर्ते मुंबईकडे
जिल्ह्यातून काही कार्यकर्ते हे पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी मुंबईकडेही रवाना झाल्याची चर्चा आहे. पंकजांकडेच थेट राजीनामे अन्य काही पदाधिकारी देणार असल्याची माहिती सू़त्रांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...