आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या निवडणुकीत डावलल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे मंगळवारी (२१ जून) पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ वाजता आष्टीत त्या भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्याला हजेरी लावून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
परळी विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अद्यापही राजकीय पुनर्वसन होऊ शकलेले नाही. एकीकडे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखले जात असलेल्या नेत्यांना भाजपकडून विविध पदांवर संधी दिली जात आहे. रमेश कराड, डॉ. भागवत कराड आणि आता प्रा. राम शिंदे यांना पक्षाने उमेदवारी देत संधी दिली. डॉ. भागवत कराड यांना तर मंत्रीही केले. मात्र, गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजांच्या बाबतीत मात्र पक्ष निर्णय घेत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आधी राज्यसभा व आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजांचे नाव आघाडीवर असतानाही त्यांचा पत्ता कट करून इतरांना पक्षाने पसंती दिली. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांच्या नाराजीचा रोखही देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. आष्टीत मेळाव्यात करणार कार्यकर्त्यांना संबोधित
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.