आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक भक्त असाही:धनंजय मुंडेंवरील संकट दूर व्हावे यासाठी नगरसेवकाचे सपत्नीक दोन किलोमीटरपर्यंत दंडवत

परळी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रभु वैद्यनाथाच्या कृपेने धनंजय मुंडे दोषमुक्त होणार - गोपाळ आंधळे

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. वैद्यनाथाने मुंडेंवरील बालंट दूर करावे यासाठी नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी सपत्नीक तब्बल दोन किलोमीटर अंतर कापत प्रभू वैद्यनाथाला दंडवत घालत प्रार्थना केली.

गोपाळ आंधळे यांनी आज (सोमवार 18 जानेवारी) रोजी दुपारी 12.30 वाजता सावतामाळी मंदिर येथून सपत्नीक दंडवत घालण्यास सुरुवात केली. नगरपरिषद गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संत सावतामाळी मंदिरापासून सुरु झालेला हा दंडवत राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक, संत जगमित्रनागा महाराज मंदिर येथून प्रभू वैद्यनाथ मंदिरापर्यंत करण्यात आला. या प्रकरणातून धनंजय मुंडे यांना दोषमुक्त करत षडयंत्र करणाऱ्यांचा चेहरा समाजासमोर यावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

संकटात सापडलेल्या भक्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या कृपेने सामाजिक न्यायमंत्री आमचे नेतृत्व धनंजय मुंडे यांच्यावर जाणून बुजून रचण्यात आलेले बालंट दुर होत असून हे शुक्लकाष्ट दूर झाल्याने माझा नवस पूर्ण झाला आहे. वैद्यनाथाच्या कृपेने मुंडे हे दोषमुक्त व्हावेत अशी प्रार्थना नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी प्रभु वैद्यनाथ चरणी केली.

बातम्या आणखी आहेत...