आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाने घवघवीत यश मिळवले. परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. यावरून निवडणूक काळात धनंजय मुंडेंवर झालेल्या आरोपाचा राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम झाला नसल्याचे दिसते आहे.
परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, लाडझरी या 6 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या. भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटाने विजय मिळवला आहे.
या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने मिळवला विजय
1 वंजारवाडी बिनविरोध
2 रेवली बिनविरोध
3 सरफराजपुर
4 मोहा
5. लाडझरी
6. गडदेवाडी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.