आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी:निलंबन रद्द करून कामावर हजर झालेल्या बसचालकाने दुसऱ्या दिवशी घेतले विष

परळीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी संपादरम्यान ११ नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आलेले बसचालक नागनाथ गित्ते हे ८ डिसेंबर रोजी कामावर हजर झाले. त्यांनी परळी आगारातून ३४ दिवसांनंतर पहिली बस बाहेर काढत परळी-बीड अशी फेरी मारली. मात्र, गुरुवारी आगारात आल्यावर त्यांनी विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर कर्मचारी संपावर ठाम असताना गित्ते गुरुवारी दुसऱ्या दिवशीही बस चालवण्यासाठी आपल्या बेलंबा या गावातून सकाळी सहा वाजता परळी आगारात आले. परंतु काही वेळातच त्यांनी विष प्राशन केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. नवनाथ गित्ते यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून प्रशासनाच्या धोरणाला व अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद केले आहे.

कुठलाही दबाव नव्हता
नवनाथ गित्ते यांनी कामावर यावे असा आम्ही कुठलाही दबाव टाकलेला नव्हता. ते स्वेच्छेने कामावर हजर झाल्यानंतर पोलिस बंदोबस्तात बस त्यांच्या ताब्यात दिली व बीडची फेरी मारल्यानंतरही त्यांना घरापर्यंत पोहोचवले. सकाळी त्यांनी अचानक विष प्राशन केल्याचे कळताच आम्ही त्यांना परळी व नंतर अंबाजोगाई येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. - प्रवीण भोंडवे, आगारप्रमुख, परळी.

बातम्या आणखी आहेत...