आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:परशुराम जन्मोत्सव, बीड येथे व्याख्यान, अंबाजोगाईत शोभायात्रेने वेधले लक्ष; नेत्रतपासणीसह गरजू विद्यार्थ्यास मदतीचा उपक्रम

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त बीड येथे बाळुदेवा मुळे आर्वीकर यांचे व्याख्यान पार पडले, तर अंबाजोगाईनगरीत पेशवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात आले. यासह बीड येथे सार्वजनिक परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीनेही भगवान परशुराम यांना वंदन करण्यात आले.

अंबाजोगाई येथे पेशवा युवा, महिला व युवती संघटनेतर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. घोडे, ढोल पथक, ताशा, लाईट छत्रीचे पथक व घोषणांच्या गजरात ही शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली. बाजीप्रभू देशपांडे चौकातून अक्षय मुंदडा, राजकिशोर मोदी, सुनील लोमटे, राम कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, नगरसेवक सुरेश कराड, संगीता व्यवहारे, मनोज लखेरा, संजय गंभीर, शिरीष पांडे, अविनाश मुडेगावकर, अमोल लोमटे, महेश लोमटे, रवी देशमुख यांच्या उपस्थितीत शोभायात्रेस प्रारंभ झाला. युवतींचे ढोल पथक शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. शोभायात्रा यशस्वितेसाठी पेशवा संघटनेचे राहुल कुलकर्णी, डॉ.महेश अकोलकर, शिरीष हिरळकर, संकेत तोरंबेकर, अक्षय पिंगळे, सुजित दीक्षित, विवेक बाभुळगावकर यांच्यासह श्रीकांत जोशी, वैभव देशपांडे, विनय चौसाळकर, हरिभाऊ माके, विवेक देशमुख, गोविंद जोशी, अक्षय देशमुख, सुमित केजकर, केदार दामोशन, गौरव कुलकर्णी, आदित्य राखे, सुयोग विर्धे, पार्थ कुलकर्णी, राघव कुलकर्णी, दशरथ देशपांडे, संजय कुलकर्णी, पद्मनाभ कुलकर्णी, रवी गोडबोले, रोहन जोशी, ऋत्विक रामदासी, वल्लभ पिंगळे, सुषेन देशपांडे, सागर दीक्षित, सागर कानसुरकर, गजानन औसेकर, पुरषोत्तम औसेकर यांनी परिश्रम घेतले. जन्मोत्सवानिमित्त तीन दिवसीय ध्यान व प्राणायाम शिबिर घेण्यात आले. यात योग शिक्षक संजय कुलकर्णी व वैजनाथ पांडे यांनी मार्गदर्शन केले. यासह रक्तदान शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले. तसेच डॉ.योगेश मुळे यांच्या नेत्रालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यासह शहर व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्यात आली.

अन्यायाविरुद्ध संघर्षरत श्री विष्णूंचा अवतार हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, सात शाश्वत देव आहेत, जे या पृथ्वीवर युगानुयुगे विराजमान आहेत. यापैकी एक म्हणजे भगवान परशुराम होय. भगवान परशुराम म्हणजे ज्ञान, बल आणि अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणारा विष्णूचा सहावा अवतार होय, असे प्रतिपादन बाळूदेवा मुळे आर्वीकर यांनी केले. याज्ञवल्क्य भवन मंगल कार्यालयात भगवान परशुराम यांची जयंती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने साजरी करण्यात आली या वेळी ते बोलत होते. भगवान परशुराम कधीही विनाकारण रागवत नसत. सम्राट सहस्त्रार्जुनचा जुलूम आणि अनाचार जेव्हा कळसावर पोहोचला तेव्हा भगवान परशुरामाने त्याला शिक्षा केली. मृत्युलोकाच्या कल्याणासाठी भगवान शिवाने परशुला शस्त्र दिले, त्यामुळे त्यांना परशुराम म्हटले गेले, असेही मुळे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी मानले तर याप्रसंगी अनिल महाराज निर्मळ, अॅड. समीर पाटोदकर, कृष्ण वांगीकर, बाळासाहेब जोशी खडकीकर, अशोक कडेकर, सुरेश देशमुख, राजू कुलकर्णी, रवी खडके, आनंद खडके, संजय देशमुख, विनायक वझे, महेश कुलकर्णी, रामराव महाजन, अमोल आगवान यांच्यासह समाज बाधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बीड येथे अभिवादन
भगवान परशुराम यांच्या जयंती उत्सवानिमित्त बीड येथे परशुरामांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले. यावेळी जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अक्षय भालेराव कुलकर्णी, जयंती उत्सव समितीचे कार्यकारी अध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रशांत सुलाखे, भालचंद्र कुलकर्णी, विशाल जोशी, देवसिंह शिंदे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, जयंती उत्सव समितीच्या मिरवणुकीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

केज येथे जयंती साजरी
केज येथे समर्थनगर भागात शिवराज मुथळे यांच्या निवासस्थानी भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष्मण महाराज इनामदार, धनंजय कुलकर्णी, श्रीराम शेटे, श्रीधर खोत, शिवराज मुथळे, पी. टी. कुलकर्णी, अनंत कोकीळ, अतुल कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, गजानन औसेकर, आदित्य विडेकर, विकास पोपळे, आदित्य कुलकर्णी आदी हजर होते. याप्रसंगी ब्राह्मण संघटनच्या केज तालुका अध्यक्षपदी किरण कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...