आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह कार्य:परभणीच्या वऱ्हाडींची जीप उलटली; एक ठार, चार जखमी ; मार्गावरील येवलवाडीजवळ अपघात

पाटोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहकार्यासाठी परभणी येथून अलिबागकडे निघालेल्या जीपचालकाचा वाहनावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे पाटोदा - मांजरसुंबा मार्गावरील येवलवाडीजवळ घडली. अजय अशोक भारती (३२, रा. परभणी) असे या अपघातातील मृताचे नाव असून ते एमएसईबीचे कर्मचारी असल्याची माहिती आहे.

परभणी येथील कुटुंब विवाह सोहळ्यासाठी अलिबागकडे जीपमधून निघाले होते. पहाटेच्या दरम्यान त्यांची गाडी पाटोद्याजवळील येवलवाडी फाट्यानजीक आली. या वेळी अचानक गाडी रस्त्याच्या खाली उतरून उलटली. गाडी दोन ते तीन वेळा उलटली. हा अपघात जीपचालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा, असा कयास काढला जात आहे. या अपघातात अजय अशोक भारती (रा. परभणी) हे जागीच ठार झाले, तर उमेश शिंदे, आनंद चौधरी, मुकुंद चाफेकानडी, लक्ष्मण पवार (सर्व रा.परभणी) हे चार जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पाटोदा पोलिस ठाण्याचे एपीआय रामचंद्र पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच सुरुवातीला अपघात घडल्यानंतर त्याच परिसरातील हॉटेलचालक किशोर नागरगोजे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदत केली.

बातम्या आणखी आहेत...