आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पालकांनो, अल्पवयीन मुलींना सांभाळा;‎ कारण नात्यातील व्यक्ती देताहेत धोका‎

बीड‎ / अमोल मुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ जिल्ह्यात अल्पवयीन मुलींची सुरक्षा वाऱ्यावर‎ असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात मागील ११‎ महिन्यांत दाखल झालेल्या बलात्कार व‎ विनयभंगाच्या एकूण गुन्ह्यात ३० टक्के गुन्हे हे‎ बाललैंगिक अत्याचाराचे आहेत यात,‎ बलात्काराच्या एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत ६३ टक्के‎ पिडीता या अल्पवयीन आहेत तर, विनयभंगाच्या‎ प्रकरणात १५ टक्के पिडीता या अल्पवयीन आहेत.‎ जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून‎ अल्पवयीन मुलींच्या बाबतीत गुन्ह्यांत वाढ होत‎ आहे. बीडमध्ये पित्याने मुलीवर अत्याचाराचा‎ प्रयत्न केला तर शिरुरमध्ये पित्याने अत्याचार‎ केल्याचे प्रकरण समाेर आले. दिंद्रूड हद्दीत‎ अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने‎ जिल्ह्यात खळबळ उडाली असून यामुळे‎ जिल्ह्यातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा‎ एकदा चर्चेत आला आहे.‎

जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात‎ जिल्ह्यात महिला अत्याचाराचे एकूण ४१० गुन्हे‎ नोंद झाले आहेत. यामध्ये, बलात्काराचे १२३ व‎ विनयभंगाचे २८७ गुन्हे नोंद आहेत. सरासरी दीड‎ दिवसाला विनयभंगाची एक घटना नोंद होत आहे‎. अत्याचार‎

हे करता येऊ शकतात उपाय‎ शाळांमध्ये ‘गुड व बॅड टच’बाबत विद्यार्थिनींना शिक्षण द्यावे‎ दर दीड दिवसाला विनयभंग अन् अडीच दिवसात अत्याचाराच्या घटना‎ शिक्षण विभागाने शाळांमध्ये गुड टच, बॅड टचचे शिक्षण द्यावे‎ दामिनी पथकांनीही शाळांमध्ये जाऊन स्पर्शज्ञानाचे धडे द्यावेत‎ शिक्षकांनी शाळांमध्ये तक्रार पेटी ठेवावी, ती सतत घडावी‎ मुलींना वाईट स्पर्श होत असेल तर कुटुंबियांना सांगण्यास‎ सांगावे‎ अत्याचाराच्या गुन्ह्यात तडजोड न करता कठोर शासन व्हावे‎

दामिनी पथके आहेत तरी‎ कुठे ? सामान्यांचा सवाल‎ जिल्ह्यात शाळकरी, महाविद्यालयीन‎ मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस‎ ठाणे निहाय दामीनी पथकांची‎ स्थापना करण्यात आली आहे मात्र,‎ जिल्हा पथकाच्या बीड शहरातील‎ किरकोळ कारवाया वगळल्या तर‎ तालुका पथकांकडून कारवायांची‎ संख्या कमी आहे‎ प्रतिबंधक कायद्यानुसार ११ महिन्यांत दाखल‎ झालेल्या गुन्ह्यांचीसंख्या १२२ इतकी आहे.‎ म्हणजेच एकूण गुन्ह्यांच्या १५ टक्के गुन्ह्यांत‎ पिडीता अल्पवयीन आहेत. धक्कादायक‎ म्हणजे बलात्काराचे सर्वाधिक ७८ गुन्हे नोंद‎ असून एकूण बलात्काराच्या गुन्ह्यांच्या तुलनेत‎ ही टक्केवारी तब्बल ६३ टक्के इतकी आहे.‎ तर, अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचे ४४ गुन्हे‎ नोंद असून याची टक्केवारी १५ टक्के इतकी‎ आहे. बलात्कार आणि विनयभंगाच्या एकूण‎ नोंद गुन्ह्यांपैकी ३० टक्के गुन्हे हे पोक्सो‎ कायद्यानुसार नोंद आहेत.‎

तत्काळ तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश‎ ‎ जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांची तक्रार‎ ‎ तत्काळ नोंदवून घेण्याचे आदेश आहेत. िपंक‎ ‎ पथक तपाससाठी असून ६० दिवसांत दोषाराेपपत्र‎ ‎ दाखल करण्याच्या सूचना आहेत. पिंक‎ ‎ पथकांबाबत काही तक्रारी असतील तर त्यांना‎ ‎ सूचना दिल्या जातील‎ - नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड‎

ओळख, नातेसंबंधातून‎ गैरफायद्याचे प्रकार‎ अल्पवयीन मुलींवरच्या‎ अत्याचाराच्या अनेक घटनांमध्ये‎ आरोपी हा पिडीतेच्या‎ नातेसंबंधातील असतो अथवा‎ त्यांच्या ओळखीचा असतो.‎ सातत्याने संपर्कात असलेल्या‎ व्यक्तींकडूनच ओळखीचा‎ गैरफायदा घेत अल्पवयीन मुलींवर‎ अत्याचार केले जातात.‎

बातम्या आणखी आहेत...