आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:परळी शहर बॅनर आणि‎ फ्लेक्स मुक्त करावे‎

परळी‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी शहर डिजिटल बॅनर, फ्लेक्स‎ मुक्त करून शहराचे विद्रुपीकरण‎ थांबवा, अशी मागणी राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेकडे‎ निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष‎ बाजीराव धर्माधिकारी यांच्या‎ नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात‎ आले.‎ परळी शहर हे बारा‎ ज्योर्तिलिंगापैकी प्रभु वैद्यनाथांचे‎ ज्योर्तिलिंग असणारे शहर असून‎ देशभरातून भाविक तिर्थयात्रेसाठी‎ येथे येत असतात.

मात्र परळी‎ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून‎ बॅनर व फ्लेक्स लावण्याची पध्दती‎ पुर्णतः चुकीची झाली आहे. या‎ बॅनर्स व फ्लेक्समुळे मुख्य रस्त्यावर,‎ चौकात वाहन वर्दळीस त्रास होत‎ होऊन शहराचे विद्रुपीकरण होत‎ आहे. परळी शहर बॅनरमुक्त व्हावे,‎ ही परळी शहरातील नागरिकांची,‎ व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे.‎ यासोबतच राज्याचे माजी मंत्री तथा‎ परळीचे आमदार धनंजय मुंडे व‎ गटनेते वाल्मीक कराड यांनीही‎ याबाबत सूचना केली असून‎ त्यानुसार डिजिटल बॅनर्स व‎ फ्लेक्समुक्तीसाठी तात्काळ योग्य‎ ती कार्यवाही करण्यात यावी, अशी‎ मागणी या निवेदनात करण्यात‎ आली आहे. यावेळी राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव‎ धर्माधिकारी, अल्पसंख्यांक‎ आघाडीचे तालुकाध्यक्ष अल्ताफ‎ पठाण व सहकारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...