आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभाग‎:स्वच्छ भारत अभियानात बीडच्या मिलिया‎ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मिलिया कला, विज्ञान व‎ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा‎ योजना विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत‎ शहीशावली दर्गा व कंकालेश्वर मंदिर परिसर येथे‎ स्वच्छता अभियान राबवण्यात आले. राष्ट्रीय सेवा‎ योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छ‎ केला तसेच प्लास्टिक बॅग, रिकाम्या पाणी बाटल्या‎ जमा केल्या.

रासेयाेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. मिर्झा‎ असद बेग यांनी ये आपला परिसर तसेच‎ महाविद्यालय स्वच्छ ठेवावा व समाजात‎ स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करावी असे‎ सांगितले. डॉ. शेख रफिक यांनी विद्यार्थ्यांना‎ स्वच्छतेचे महत्त्व सांगितले व स्वच्छतेची शपथ‎ दिली. अभियानात डॉ. शेख एजाज परवीन, डॉ.‎ रमेश वारे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमास‎ प्राचार्य डॉ. मोहम्मद इलियास फाजील यांचे‎ मार्गदर्शन लाभले.‎

बातम्या आणखी आहेत...