आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानित‎:आदर्श शिक्षक पुरस्काराने पठाण माजेद खान सन्मानित‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव येथील बुखारी उर्दू माध्यमिक शाळेतील शिक्षक पठाण माजेद खान यांना‎ इन्स्पायर कोचिंग क्लासेसच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले‎ आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे रविवारी (ता.१ जानेवारी)‎ सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

माजी आमदार सय्यद सलीम,‎ एमआयएम जिल्हाध्यक्ष अॅड.शेख शफीक, सुनील मगरे, शाहिद कादरी आदी मान्यवरांच्या‎ हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी बुखारी उर्दू संस्थेचे सचिव खुर्शीद नाईक, प्राचार्य‎ हारुण, नवीन यांच्यासह सहकारी शिक्षक, मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...