आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:रूग्णांना पिण्यासाठी पाणी नाही; वडीगोद्रीत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला शिवसेनेचे निवेदन

वडीगोद्री19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी व सुविधा उपलब्ध नसल्याने वडीगोद्री शिवसेनेच्या वतीने सोमवारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनात म्हटले, यापूर्वी शिवसेनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कर्मचारी देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले होते,परंतु कर्मचारी न देता ते कमी करण्यात आले असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.

रूग्णालयात रूग्णांना पिण्यासाठी पाणी नाही, स्वच्छतागृह बंद आहे तसेच कर्मचारी कमी आहेत या गोष्टी निदर्शना आल्या आहे असे युवा सेनेचे बंटी आटोळे यांनी सांगितले. या सर्व असुविधाबाबत वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिकाम्या खुर्चीला शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. दोन दिवसात सदर मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या वेळी अविनाश मांगदारे, विभागप्रमुख बाळासाहेब गावडे, शाखाप्रमुख रमेश काळे, युवासेनेचे कुलदीप आटोळे, नितीन काळे, सचिन देवकाते, लहु राठोड आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...