आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:पाटोदा नगरपंचायतचे नूतन मुख्याधिकारी‎ चंद्रकांत चव्हाण यांचा सत्कार‎

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवनिर्वाचित मुख्याधिकारी चंद्रकांत‎ चव्हाण यांनी नुकताच पदभार स्विकारला. गुरुवारी‎ (दि.३ नोव्हेंबर) चव्हाण यांचे सभापती श्रीहरी गीते‎ पाटील तसेच पाटोदा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार‎ करून स्वागत करण्यात आले. चंद्रकांत चव्हाण‎ यांची तरुण व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख‎ असून त्यांनी यापूर्वी गडचिरोली, चंद्रपूर, राहता या‎ ठिकाणी सेवा बजावली आहे.

त्यांनी नुकताच पाटोदा‎ नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणून पदभार‎ स्वीकारला असून येत्या काळात सर्वसामान्यांचे‎ प्रशासकीय कामे सुलभरीत्या व तातडीने मार्गी‎ लागावीत यासाठी आपण आवश्यक ती यंत्रणा‎ राबवून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे‎ त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी त्यांचा सत्कार‎ करून स्वागत करण्यात आले. यावेळी पाटोदा‎ नगरपंचायतचे गटनेते बळीराम पोटे, सभापती श्रीहरी‎ गीते, पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमीनाथ‎ कोल्हे, सचिव महेश बेदरे, ज्येष्ठ पत्रकार पोपट‎ कोल्हे, शेख महेशर, दत्ता वाघमारे, मंगेश नेमाने‎ यांच्यासह कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...