आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन प्रणालीद्वारे‎ दर:शिक्षकांचे वेतन पाच‎ तारखेपर्यंत करा : मुंदडा‎

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्हयातील‎ शिक्षकांचे वेतन, वेतन प्रणालीद्वारे‎ दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत‎ करा, अशी मागणी आ. नमिता‎ मुंदडा यांनी शालेय शिक्षण‎ मंत्र्याकडे केली आहे.‎ महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद‎ अंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचे‎ मासीक वेतन वेळेवर प्राप्त होते.परंतु‎ बीड जिल्हा परिषद अंतर्गत‎ असलेल्या सर्व शिक्षकाचे वेतन ५‎ तारखेच्या आत होत नसल्याने‎ शिक्षक, दिव्यांग कर्मचारी यांना‎ आर्थिक समस्यांना सामोरे जावे‎ लागते.

शासन निर्णया प्रमाणे व‎ महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा‎ प्रमाणे बीड जिल्हयातील जि.प.‎ शिक्षकांचे वेतन, वेतन प्रणाली द्वारे‎ दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत‎ करणेबाबत शिक्षकांमधून मागणी‎ आहे.‎ महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा‎ प्रमाणे बीड जिल्हयातील जि.प.‎ शिक्षकांचे वेतन, वेतन प्रणाली द्वारे‎ दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत‎ करणेबाबत संबंधिताना आदेश‎ द्यावेत अशा आशयाचे निवेदन‎ आमदार नमिता मुंदडा यांनी शालेय‎ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना‎ दिले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...