आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती मृत्‍यू:सारूळ येथे कारच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीस भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना केज - मांजरसुंबा रस्त्यावर सारूळ येथे घडली. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सारूळ (ता. केज) येथील बलभिम आश्रुबा ढाकणे हे १ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास केज - मांजरसुंबा रस्त्यावरून पायी चालत निघाले असता सारूळ येथील सह्याद्री अकॅडमीसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (एम.एच. १२ के.जे. ३०२३) जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या बलभीम आश्रुबा ढाकणे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...