आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:2100 वनस्पतींचे दंडकारण्या; तर रस्त्यालगत 200 पिंपळवृक्षांचे संवर्धन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्री क्षेत्र रामगड येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. रामगड येथील दंडकारण्यामध्ये एकूण 65 प्रकारच्या 2100 वनस्पती लागवड करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्याच्या कडेला 200 पिंपळवृक्ष लागवड करून संवर्धन करण्यात आलेले आहे, म्हणून या ठिकाणी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रसंगी राजेश एच खटावकर अधीक्षक वर्ग 2 माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड. व नानाभाऊ हजारे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या हस्ते वृक्षलागवड कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दोन्ही मान्यवरांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना पर्यावरण या विषयात जनजागृती व प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ अरुण दैतकार यांनी मागच्या वर्षी लागवड केलेल्या दंडकारण्य प्रकल्पाविषयी तसेच विविध वनस्पती याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. आणि वृक्ष चळवळ कशा पद्धतीने सामाजिक स्तरावर नेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. वर्षभर केलेल्या वृक्ष संवर्धन कार्यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केले त्याबद्दल या ठिकाणी या सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच श्री क्षेत्र रामगडाचे महंत श्री स्वामी योगीराज महाराज यांनी या गडावरील जमीन वृक्ष लागवडीसाठी व संवर्धनासाठी वर्षभर सहकार्य केले.

तसेच विविध ठिकाणी महाराजांनी जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी कीर्तनाच्या माध्यमातून तसेच विविध बैठकातून समाजामध्ये वृक्षलागवड चळवळ निर्माण करणे त्यामध्ये महाराजांनी फार मोठे योगदान दिले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पर्यावरण प्रेमी श्री नितेश अग्रवाल (यूथ फोर फ्युचर ) व पर्यावरण प्रेमी श्री भरत बिडवे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ प्रकाश कोंका कनिष्ठ विभागाचे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा ब्रह्मनाथ मेंगडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा राजाभाऊ नागरगोजे श्री बंकट्स्वामी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक शिवाजी भारती तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य स्वयंसेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या पुढील वृक्ष लागवडीसाठी नियोजन
कार्यक्रमाच्या प्रसंगी बीड शहरातील विविध पर्यावरणप्रेमी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच नवीन स्वयंसेवक विविध क्षेत्रात काम करणारे व पर्यावरणासाठी वर्षभर झटणारे आणि काम करणारे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये अनेकांनी आपले अनुभव कथन केले. या पुढील वृक्ष चळवळ कशा पद्धतीने गतिमान करता येईल आणि वृक्ष लागवडीसाठी नियोजन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...