आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील पेंडगाव, कांबी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुखदेव धट तर व्हाईस चेअरमनपदी कांताराव काळकुटे यांची बिनविरोध निवड झाली असून ही सोसायटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आली असून या सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा फडकला आहे.
पेंडगाव, कांबी या गु्रप सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली असून चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक देखील बिनविरोध झाली आहे. चेअरमनपदी सुखदेव दत्तात्रय धट तर व्हाईस चेअरमनपदी कांता शामराव काळकुटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संचालक सर्व श्री जालिंदर धट,, बळीराम गाडे, रमेश गाडे, शेषेराव काळकुटे, अनुरूद्र काळकुटे, कचरू डोंगरे, हरीभाऊ मेडकर, सोमा पवार, गोपाळ गुरखुदे, आशाबाई नवनाथ भडके, सुनिता सुदाम दांगट आदि उपस्थित होते. नवनिर्वाचीत चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, अरूण डाके, नानासाहेब काकडे, अरूण बोंगाणे, संभाजी धट, गणेश मस्के आदि उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.