आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा इशारा:प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ खात्यात जमा करावी : शेख

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या बँक खात्याला केवायसी नसल्यामुळे शिष्यवृत्ती जमा होत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. संबंधितांना प्रशासनाने तातडीने शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी शहराध्यक्ष शेख मोहसिन यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनासारख्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यावर्षी शैक्षणिक वर्ष चांगल्या पद्धतीने सुरू झाले असून मात्र विद्यार्थ्यांचे हक्काचे असणारी शिष्यवृत्ती केवायसीमुळे व बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे व हम करे सो कायदा या धोरणामुळे मिळालेली नाही. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहे. तरी बँकेने या विद्यार्थ्यांची तात्काळ केवायसी जोडून त्यांच्या खात्यावर तात्काळ शिष्यवृत्ती जमा करावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची अडवणूक न करता त्यांना सहकार्य करून त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा करावी नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदनही प्रशासनास देण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...