आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनाधार:विकास आपला हेतू‎ असल्यामुळेच जनाधार

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड शहरात होत असलेल्या‎ विकासकामांचा वाढता आलेख‎ जनतेसमोर स्पष्ट आहे. काम मंजूर‎ करून आणून ते पूर्ण करण्यापर्यंत‎ आपला हेतू हा विकासाभिमुख‎ राहिला आहे. लोकांना पण याची‎ हळूहळू जाणीव होत आहे. त्यामुळे‎ शहरातील अनेक व्यक्ती आपणाला‎ पाठिंबा देत आहेत. शहराचा विकास‎ हाच एकमेव हेतू असल्याने‎ जनाधार वाढत असल्याचे प्रतिपादन‎ डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.‎ बीड शहरातील प्रकाश‎ आंबेडकर नगर भागातील शहादेव‎ वंजारे यांनी आपल्या असंख्य‎ कार्यकर्त्यांसह माजी मंत्री जयदत्त‎ क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष‎ डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली व डॉ.योगेश‎ क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली‎ क्षीरसागर गटात जाहीर प्रवेश केला.‎ याप्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर हे‎ बोलत होते. त्यांनी शहादेव वंजारे‎ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत‎ केले.

प्रकाश आंबेडकर नगर भागात‎ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि‎ नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर‎ यांच्या प्रयत्नातून अनेक विकासाची‎ कामे झाली आहेत. तरी देखील‎ विकासाचा राहिलेला अनुशेष‎ लवकरच भरून काढण्यात येईल.‎ अलीकडच्या काळात या भागाची‎ हद्द मोठ्या प्रमाणात वाढल्याने‎ समस्या देखील वाढल्या आहेत.‎ मात्र या समस्या सोडविण्यासाठी‎ तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.‎ ज्या-ज्या भागाची हद्द वाढ झाली‎ आहे अशा भागात काम करत‎ असताना रस्ते,नाली पाणी आणि‎ वीज यासह इतर समस्या सोडवाव्या‎ लागतात.

या भागात मोठ्या‎ प्रमाणात गोर-गरीब जनता राहत‎ असल्याने त्या सर्वांना राहण्यासाठी‎ हक्काचे चांगले घर मिळावे यासाठी‎ रमाई आवास घरकुल योजना आणि‎ पंतप्रधान आवास घरकुल‎ योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळवून‎ देण्यासाठी सहकार्य करु, असेही‎ त्यांनी सांगितले. यावेळी माजी‎ नगरसेवक सुधीर भांडवले, मनोज‎ मस्के, दिपक चौघुले, राजेंद्र‎ कुसळकर, गोरख काळे, शुभम‎ कातांगळे, कल्याण ढोले, अमोल‎ गलधर, माजेद कुरेशी, अनिल‎ वंजारे, विलास चक्रे, शेख शकील,‎ विजय जगधने यांच्यासह‎ परिसरातील नागरिक आणि महिला‎ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.‎

बातम्या आणखी आहेत...