आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील जनतेने प्रचंड प्रेम केले. त्यांच्या पश्चात हे प्रेम आमच्या वाट्याला आले आहे. या प्रेमात तसूभरही कमतरता जाणवली नाही. याउलट दिवसेंदिवस या प्रेम आणि आशीर्वादामध्ये वाढ होते आहे. जनतेच्या या प्रेमातून उतराई होण शक्य नाही, परंतु विकास कामांच्या माध्यमातून आणि तुमच्या सेवेतून या प्रेमाचा सन्मान करत राहू, अशी ग्वाही खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी केले. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत माजलगाव तालुक्याच्या गोविंद वाडी इथे मंजूर झालेल्या तीन कोटी सत्तेचाळीस लक्ष रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन खासदार डाॅ. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर डॉ. प्रकाश आनंदगावकर, भाजप नेते रमेश आडसकर, मोहनराव जगताप, बबन सोळंके, बाबरी मुंडे, रमेश कराड, प्रदीप जाधवर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वामुळे आम्हाला तुमची पाण्याची अडचण सोडवण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या योजनेमुळे ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचणार आहे. जिल्ह्याची खासदार म्हणून या योजनेचे पहिले भूमिपूजन गोविंद वाडीत करताना मनस्वी आनंद होतो आहे, लोकनेते मुंडे यांच्या प्रवासातील तुम्ही सोबती आहात. तुमच्या गावचा पाण्याचा प्रश्न मला सोडवता आला हे मी माझे भाग्य समजते असेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आबालवृद्धांकडून ठिकठिकाणी स्वागत
गोविंदवाडी इथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभासाठी जाताना खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचे गावोगावी जल्लोषात स्वागत झाले. यावेळी महिला भगिनींकडून औक्षण, आबाल वृद्धांकडून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात अाली. गोविंद वाडी इथे तर घरोघरी महिला भगिनी औक्षण करत होत्या, ढोलताशांच्या गजरात जेसीबी तून पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी खासदार मुंडे यांचे स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.