आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:नगर- पालिकेने बांधकामासाठी दिली परवानगी; गोविंदनगरातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धानोरा रोड, गोविंदनगर भागातील वाढीव नगर परिषद हद्दीतील एका वादग्रस्त जागेचे प्रकरण जिल्हा न्यायालयात चालू असताना बीड नगरपालिकेकडून बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. याबाबत रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून बांधकाम थांबवले नाही तर पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

गोविंदनगर भागातील या जागेचा अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. रस्त्यावरच हे बांधकाम सुरू केल्याने नागरिकांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने येेथील नागरिकांच्या बाजूने निकाल देऊन बांधकामावर स्थगिती आणली होती.

त्यानंतर उपरोक्त जागेच्या संबंधित मालकाने पुन्हा अपील करून स्टे उठवून पुन्हा सदरील जागेची खरेदी-विक्री करून आता नवीन मालकाने त्या जागेवर बांधकाम चालू केलेले आहे. त्या भागातील रहिवाशांनी हे प्रकरण न्यायालयात पुन्हा चालू केलेले आहे. तरी, नगरपालिका प्रशासनाकडून बांधकाम परवानगी देण्यात आली. हे बांधकाम सोमवारपर्यंत रद्द केले नाही तर सर्व रहिवासी नगरपालिकेच्या दारातच उपोषण सुरू करतील, असा इशारा गोविंदनगर भागातील रहिवाशांनी दिला आहे. त्यामुळे आता बीड नगर पालिका यापुढे काय भूमिका घेईल, याकडे बीडच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...