आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठात याचिका‎:दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या‎ भरपाईसाठी खंडपीठात याचिका‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत जमीन खरडून व‎ घरांची पडझड होऊन अतोनात नुकसान‎ झाले होते. शेतकऱ्यांना मंजूर झालेली २८‎ कोटी २५ लाख रुपयांची मदत अद्याप‎ मिळालेली नाही. त्यामुळे पटेल‎ फाउंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल यांनी‎ आमदार संदीप क्षीरसागर व माजी आमदार‎ अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली‎ औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल‎ केली आहे.‎ २०२०-२१ मध्ये तालुक्यातील‎ नांदूरहवेली, खामगाव, आहेर चिंचोली,‎ तांदळवाडी हवेली, भाटसावंगी, कुर्ला,‎ पारगाव जप्ती, माळापुरी, पिंपळनेर, ‎ताडसोन्ना या गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची जमीन पुराच्या पाण्यामुळे ‎खरडून गेली होती. शासनाने नुकसानग्रस्त ‎शेतकऱ्यांना ३७ हजार ५०० रुपये प्रति‎ हेक्टर अनुदान जाहीर केले होते.

२८ कोटी ‎२५ लाख रुपयांच्या मदतीची तालुकानिहाय ‎ यादी प्रशासनाने पाठवली होती. मात्र, दोन ‎वर्षांनंतरही अद्याप हे शेतकरी मदती पासून ‎वंचित आहेत. ७ सप्टेंबर रोजी पटेल ‎फाउंडेशनचे अध्यक्ष शाहेद पटेल यांनी ‎आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान‎ सचिव असीमकुमार गुप्ता यांची भेट घेत‎ हा प्रश्न मांडला.मात्र, त्यानंतरही‎ प्रशासनाकडून मदतीच्या संदर्भात पाउले‎ उचलली नाहीत. त्यामुळे पटेल यांच्यासह‎ शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली.‎

मदत मिळेपर्यंत लढा सुरू‎ दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान‎ झाले होते. यामुळे उभ्या पिकांची तर हानी‎ झालीच, पण घरांची पडझड व जमीन‎ खरडून गेली. पंचनामे होऊन भरपाई मंजूर‎ झाली, पण निधी नसल्याची सबब देत‎ निधीस चालढकल केली जात आहे.‎ यासाठी आता न्यायालयीन लढाई लढावी‎ लागत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत‎ लढत राहणार आहे.‎ - शाहेद पटेल, अध्यक्ष पटेल फाऊंडेशन‎ मदत मिळेपर्यंत लढा सुरू‎ दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान‎ झाले होते. यामुळे उभ्या पिकांची तर हानी‎ झालीच, पण घरांची पडझड व जमीन‎ खरडून गेली. पंचनामे होऊन भरपाई मंजूर‎ झाली, पण निधी नसल्याची सबब देत‎ निधीस चालढकल केली जात आहे.‎ यासाठी आता न्यायालयीन लढाई लढावी‎ लागत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत‎ लढत राहणार आहे.‎ - शाहेद पटेल, अध्यक्ष पटेल फाऊंडेशन‎

बातम्या आणखी आहेत...