आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी:‘ज्योती झाली ज्वाला’तून मांडले फुले दांपत्याचे कार्य; परळी महात्मा फुले जयंती निमित्त एकपात्री प्रयोग

परळीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या शिक्षणाच्या चळवळीमुळे आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. देशाच्या पंतप्रधानापर्यंतची जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे. सावित्री तुझी मुले, सावित्री तुझी फुले हा विचार प्रत्येक घरात पोहोचला असल्याचे सांगत प्रा.शितल गोरे-कानडे यांनी ‘ज्योती झाली ज्वाला’ या एकपात्री प्रयोगातून फुले दांपत्याचे कार्य मांडले.

महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतिने सोमवारी (ता. ११ एप्रिल) परळीतील संत सावतामाळी मंदिरात हा प्रयोग पार पडला. व्यासपीठावर प्रा.नरहरी काकडे, पोलिस उपनिरीक्षक चाँद मेंडके, पत्रकार राजेश साबने, दत्तात्रय काळे, महादेव शिंदे, मधुकर निर्मळ आदींची उपस्थिती होती. प्रा.शितल गोरे-कानडे यांनी ‘ज्योती झाली ज्वाला’या एकपात्री प्रयोगाच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकुल परिस्थितीत स्त्री शिक्षणास सुरुवात केली. त्यांच्या या कार्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत, असे गोरे यांनी सांगितले. याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंगद माळी व पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. सायंकाळी सहा वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. सावतामाळी मंदिर येथून निघालेली ही मिरवणुक राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, वैजनाथ सोळंके, गोपाळ आंधळे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहरप्रमुख राजेश विभुते, देविप्रसाद पांडे, रमेश चौंडे, भाजपाचे ॲड.अरुण पाठक, योगेश पांडकर, माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, वाघमारे यांनी स्वागत केले.

परळीतील सावता महाराज प्रवेशद्वाराचे उद्घाटन
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त गणेशपार रोडवर उभारण्यात आलेल्या संतश्रेष्ठ सावता महाराज प्रवेशद्वाराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यासह मिलींद विद्यालयासमोरील चौकाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे नामकरण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फुले दांपत्याच्या जीवनकार्याला उजाळा दिला. शहर व परिसरातील समाज बांधवांची याप्रसंगी हजर होते.