आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात युवा शिवराज्य प्रतिष्ठान वाघाळा व श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्ग जागर व छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित गडकिल्ल्यांचे चित्र प्रदर्शन ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
वाघाळा तालुका पाथरी येथील युवा शिवराज्य प्रतिष्ठानचे हनुमंत घुंबरे व सचिन वाघ यांनी पुढाकार घेतला. किरण स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम काटे, उबाळे, प्राचार्य पंढरीनाथ जोशी हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.