आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुग्धाभिषेक:कनकालेश्वर महादेवाच्या पिंडीस दुग्धाभिषेक; पंतप्रधान मोदींचा पंकजा मुंडेंवर कृपाशीर्वाद राहावा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर कृपाशीर्वाद रहावा म्हणून बीड येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बीड शहराचे ग्रामदैवत असलेल्या कनकालेश्वर महादेवाच्या पिंडीस दुग्धाभिषेक करत महाआरती केली.विधान परिषदेच्या निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कायम कृपाशीर्वाद राहावा, त्यांच्यासमोरील संकटे दूर व्हावीत म्हणून शुक्रवारी सकाळी पंतप्रधान मोदींची प्रतिमा हाती घेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील कनकालेश्वर महादेव मंदिरात जावून पिंडीवर दुग्धाभिषेक केला. त्यानंतर आरती करण्यात आली. मंदिरातून अभिषेक करून बाहेर पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ‘पंकजाताई तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ हे...’अशा जोरदार घोषणा दिल्या. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी, तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, बालाजी पवार, संदीप उबाळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...