आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोणत्या माणसावर कशी परिस्थिती येईल हे सध्याच्या काळात सांगणे कठीण आहे.त्यामुळे तिचा सामना करण्याचे नियोजन करावे. पण आपण गेल्यावर आपल्या कुटूंबासाठी काहीतरी तुटपुंजी सोय करावी ह्यासाठी माणसाने आपल्या परीने सोय करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बबन महाराज बहिरवाल यांनी केले. कडा येथील विठ्ठल सापते यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता.त्या अपघातात त्यांचे अपघाती निधन झाले.
त्यामुळे नागेबाबा मल्टीस्टेटने त्यांना विमा कवचमधून १० लाख रूपयांचा विमा मंजूर करत ३ फेब्रुवारी २०२३ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत मयताच्या वरसांना घरी जाऊन धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी बबन महाराज बहिरवाल बाेलत होे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार गणेश दळवी हे होते. यावेळी विष्णु महाराज आंधळे, निवृत्ती महाराज बोडखे, दादा महाराज चांगुणे, कडा गावचे सरपंच युवराज पाटील, शेरीचे सरपंच संदिप खकाळ, उपसरपंच दिपक सोनवणे, बाळासाहेब वाघुले, नवनाथ औंदकर, रेवननाथ राऊत, आष्टी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद ढोबळे, रघुनाथ कर्डिले, नितीन कांबळे, प्रविण पोकळे, संजय खंडागळे आदी उपस्थित होते. यासह बँकेच्या वतीने यशवंत मिसाळ, देविदास कदम, पोपट जमधडे, कडा शाखेचे नवनाथ वंजारे, आष्टी शाखेचे संदिप टेकाडे यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.