आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नियोजन, सुसंवादाने उत्सव ‘निर्विघ्न’; एसपी ठाकूर, एएसपी लांजेवार, नेरकर यांची मेहनत कामी

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्हा पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्विकारल्यानंतर त्यांच्यासाठीचा हा पहिलाच मोठा टास्क होता. अपर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर आणि सर्व उपविभागीय पोलिस अिधकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हा टास्क यशस्वी केला. नियोजन आणि थेट नागरिकांत जाऊन साधलेला संवाद त्यांच्या कामी आला त्यामुळे एकाही गंभीर गुन्ह्याची नोंद गणेशोत्सवाच्या काळात झाली नाही.

संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात कोरोनानंतर होणारा यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान यंत्रणेसमोर होते. त्यातच एसपी म्हणून नंदकुमार ठाकूर यांच्यासाठी जिल्हा नवीन होता आणि हा पहिलाच मोठा उत्सव होता. मात्र, सुरुवातीपासून ठाकूर यांनी शांतता समितीच्या बैठकांमधून नागरिकाशी संवाद साधला. अपर अधीक्षक सुनिल लांजेवार, कविता नेरकर यांच्यासह डीवायएसपी आणि ठाणेप्रमुख यांची त्यांना साथ मिळाली. उत्सवा दरम्यान विविध मंडळांना ठाकूर यांनी भेटी दिल्या. मंडळांसाठी पारितोषीकेही ठेवली. विसर्जन मिरवणूका शिस्तीत व्हाव्यात यासाठी शुक्रवारी एसपर ठाकूर स्वत: रस्त्यावर उतरले होते.सर्वच यंत्रणेच्या एकत्रित कामामुळे जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार न घडता व गालबोट न लागता गणेशोत्सवनिर्विघ्न पार पडला.

बातम्या आणखी आहेत...